About Us

प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना अतिशय लाडाने वाढवतात ,शिकवितात ,चांगले संस्कार करतात. आपली मुलं आपल्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान व्हावीत यासाठी वाट्टेल ते करून त्यांना चांगले आणि त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. मुलं शिकतात,नोकरी अथवा व्यवसाय करू लागतात मग वेळ येते ती त्यांच्या विवाहाची. आपल्याला सुंदर,सुशिक्षित ,सोज्वळ ,मनमिळाऊ पत्नी /सून मिळावी अशी मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची तर उच्चशिक्षित,सद्रुड,निर्व्यसनी पती / जावाई मिळावा ही मुलीची आणि तिच्या आईवडिलांची इच्छा असते.

हल्ली धकाधकीच्या आणि वेगाने पुढे जाणाऱ्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या कामांमध्ये अतिशय व्यस्त झाली आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर कामांना वेळ देणंही शक्य होत नाही. त्यामुळे स्वतःच्या लग्नासाठी स्थळ पाहायला जाणे, त्यासाठी दूरचा प्रवास करणे, नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींची व्यवस्था करणे एवढा वेळच कोणाकडे उपलब्ध होत नाही. एकंदरीत पारंपारिक पद्धतीनुसार लग्न जमविण्यात खूप पैसा,वेळ आणि मेहनत खर्च होते.

वरील सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही आपल्यासाठी एक आगळीवेगळी वेबसाईट विवाहअक्षता.com घेऊन आलो आहोत. यामध्ये समाजातील विविध धर्मांच्या स्थळांची सविस्तर माहिती एका क्लिकवर आपणास अगदी घरबसल्या उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून आपणास आपल्या समाजातील अथवा इतर समाजातील अनुरूप जोडीदाराची निवड करता येईल.तसेच प्रत्येकाच्या गरजेनुसार सदस्यता नोंदणी भरण्याचे तीन ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यासाठीची फीस पण अतिशय माफक ठेवलेली आहे कारण पैश्यांपेक्षा आपणास सुयोग्य अनुरूप जोडीदार आमच्या वेबसाईटद्वारे मिळाल्यास आम्हास भरपूर आनंद व समाधान मिळणार आहे आणि म्हणूनच आपण या आमच्या वेबसाईटचा नक्की विचार करा.

।। आपणास हार्दिक शुभेच्छा ,धन्यवाद ।।